Spread the love

जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात पालकमंत्री गुलाबराव पाटील!

पाच वेळा आमदार, प्रदीर्घ मंत्रिपदाच्या अनुभवांनंतर सहकार क्षेत्रातही एन्ट्री; जळगाव तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव | दि. ३० ऑक्टोबर | प्रतिनिधी

जिल्ह्याच्या राजकारणात प्रदीर्घ अनुभव आणि पाच वेळा आमदार म्हणून कामगिरी बजावणारे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी आता सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही सहभाग नोंदवला आहे. त्यांनी जळगाव तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजकारणातील प्रदीर्घ वाटचाल, आमदारकीचा अनुभव आणि मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी सहकार क्षेत्रातील निवडणुकीत थेट उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना मान्यवरांची उपस्थिती

उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोलदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर मनोज चौधरी, महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच जळगाव तालुका व जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

याशिवाय विविध विकास सोसायट्यांचे ठरावधारक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही यावेळी उपस्थिती लावली.

गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version