Spread the love

पाथरी न्यायालयाच्या प्रस्तावाला मंजुरी द्या!

न्यायालय कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता, पदनिर्मिती व निधी मंजूर करण्याची आमदार राजेश विठेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

परभणी | प्रतिनिधी – रामचंद्र अन्नदाते

पाथरी येथे प्रस्तावित न्यायालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता, न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती तसेच अनुषंगिक खर्चास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजेश विठेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

पाथरी येथील प्रस्तावित न्यायालय सुरू करण्यासाठी शासन निर्णय तातडीने निर्गमित करावा. तसेच न्यायालयासाठी स्वतंत्र नवीन इमारत आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने मंजूर करावा, अशी मागणीही आमदार विठेकर यांनी निवेदनाद्वारे केली.

पाथरी येथे न्यायालय सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होईल. त्यामुळे न्यायालयाच्या प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळावी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून न्यायालय प्रत्यक्षात सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version