Spread the love

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण रुजू!

निवृत्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडून स्वीकारला पदभार; जिल्हा प्रशासनात नेतृत्वबदल

परभणी | जिल्हा प्रतिनिधी : रामचंद्र अन्नदाते

परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे अण्णासाहेब चव्हाण यांनी आज, दि. ३१ ऑक्टोबर रोजी स्वीकारली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडून त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. संजयसिंह चव्हाण हे नियत वयोमानानुसार आज शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अण्णासाहेब चव्हाण यांनी जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारत जिल्हा प्रशासनाची सूत्रे आपल्या हाती घेतली.

विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष

नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे परभणी जिल्हा प्रशासनात नेतृत्वबदल झाला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे, प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करणे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करणे या बाबींवर नव्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्या पद्धतीने भर दिला जातो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version