Spread the love

सावद्यात ऑल इंडिया पँथर सेनेत २० तरुणांचा जाहीर प्रवेश!

विश्रामगृहात प्रवेश सोहळा उत्साहात; यावल-रावेर तालुक्यात संघटनात्मक विस्ताराला बळ, विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सावदा | अक्षय वाघ – प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील सावदा येथे १ नोव्हेंबर २०२६ रोजी ऑल इंडिया पँथर सेनेचा कार्यकर्ता प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी तब्बल २० तरुणांनी संघटनेत जाहीर प्रवेश करून पँथर सेनेच्या विचारधारेनुसार सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रवेशामुळे यावल आणि रावेर तालुक्यात संघटनेच्या विस्ताराला बळ मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

सावदा येथील विश्रामगृहात आयोजित या कार्यक्रमाला ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पानपाटील, उपजिल्हाध्यक्ष अजय भाऊ शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भाऊ वाघ, यावल तालुकाध्यक्ष सतीश भाऊ अडकमोल आणि सावदा शहराध्यक्ष सचिन भाऊ तायडे यांच्यासह यावल व रावेर तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विविध पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर

प्रवेश सोहळ्यादरम्यान संघटनेच्या कार्यविस्ताराच्या दृष्टीने काही कार्यकर्त्यांच्या पदनियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये दयाराम लोटू पाटील यांची यावल तालुका उपाध्यक्षपदी, फिरोज भिकारी तडवी यांची रावेर युवा तालुका उपाध्यक्षपदी आणि धीरज भगवान तायडे यांची यावल तालुका युवा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

तसेच दीपक हिरामण मेढे यांची यावल तालुका युवक अध्यक्षपदी, शेख फारुक शेख मुस्ताक यांची यावल शहराध्यक्षपदी, इरफान गुलशेर तडवी यांची यावल तालुका युवा सचिवपदी, तर दिलीप किसन अडकमोल यांची यावल तालुका कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा

नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेच्या सामाजिक कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगामी काळात परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version