Spread the love

माजी समाजकल्याण राज्यमंत्री मधुकरराव घाटे यांना मान्यवरांची आदरांजली!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात ३२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन; सामाजिक व राजकीय कार्याच्या आठवणींना उजाळा

मुखेड | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी समाजकल्याण राज्यमंत्री स्वर्गीय मधुकरराव घाटे यांच्या ३२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुखेड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

सामाजिक व राजकीय कार्याचे स्मरण

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय मधुकरराव घाटे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे स्मरण केले. समाजकल्याण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी ॲड. राम शिलकंठम, अर्जुन गायकवाड सर, प्रा. संघशिल भद्रे ऊर्फ एस. एन. नांदेडकर सर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version