Spread the love

भुसावळ ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर डॉ. छाया देशमुख (फालक) यांची निवड!

नियामक मंडळ व कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती; शासन निर्णयानुसार समितीची पुनर्रचना

भुसावळ | प्रतिनिधी : प्रमोद पाटील

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालय, भुसावळ येथील रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळ आणि कार्यकारी समितीवर प्रभाग क्रमांक २५ च्या भाजप नगरसेविका डॉ. छाया रुपेश देशमुख (फालक) यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ (गट-अ) यांनी जारी केले आहे.

शासन निर्णयानुसार समितीची पुनर्रचना

राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत रुग्ण कल्याण समित्यांच्या संरचनेत कालानुरूप सुधारणा करणे, लोकप्रतिनिधींचा प्रभावी सहभाग वाढविणे आणि आरोग्य संस्थांमध्ये एकसमान, उत्तरदायी व रुग्णकेंद्रित व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करणे, या उद्देशाने शासनाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्णय प्रसिद्ध केला होता.

या शासन निर्णयाच्या अनुषंगाने भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. छाया रुपेश देशमुख (फालक) यांचा दोन्ही समित्यांमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

आरोग्य व्यवस्थापनात लोकप्रतिनिधींचा सहभाग

रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून रुग्णालयातील सुविधा, रुग्णसेवा आणि व्यवस्थापनाशी संबंधित बाबींमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. डॉ. छाया देशमुख यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णकेंद्रित सेवा आणि सुविधांच्या अनुषंगाने काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version