Spread the love

कावळे ग्रामपंचायतीचे अधिकारी साहेबराव पांडुर्णिकर मुखेडमध्ये सन्मानित

जन्मभूमीत आगमनानिमित्त कोमलबाई मुंडे नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपुलकीने सत्कार; प्रशासकीय कार्याचा गौरव

मुखेड | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या कावळे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी तथा उत्कृष्ट कार्यशील आणि उपक्रमशील अधिकारी साहेबराव पांडुर्णिकर यांनी आपल्या जन्मभूमी मुखेड येथे भेट दिली. यावेळी कोमलबाई मुंडे नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे त्यांचा आपुलकीच्या वातावरणात विशेष सत्कार करण्यात आला.

शाल व पुष्पहार देऊन गौरव

कोमलबाई मुंडे नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित या सत्कारप्रसंगी प्राचार्य तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर यांच्या हस्ते साहेबराव पांडुर्णिकर यांना शाल व पुष्पहार अर्पण करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी त्यांच्या प्रशासकीय कार्याबद्दल आदर व्यक्त करत जुन्या स्नेहसंबंधांना उजाळा दिला. जन्मभूमीत मिळालेला सन्मान हा काम करण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा असतो, अशी भावना पांडुर्णिकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version