Spread the love

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सतिश चांडोळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य; कोमलबाई मुंडे नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये विशेष सन्मान सोहळा

मुखेड | प्रतिनिधी :

चांडोळा येथील सुपुत्र तथा उच्चविद्याविभूषित सतिश निळकंठ पाटील चांडोळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून सातत्याने परिश्रम घेत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत त्यांना घडविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि मार्गदर्शन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत कोमलबाई मुंडे नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सतिश चांडोळकर यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, आपले मित्र संघशिल भद्रे सर यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल सतिश चांडोळकर यांनीही त्यांचा सन्मान करून आनंद आणि सद्भावना व्यक्त केली.

प्रेरणेतून विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रवास

सत्काराला उत्तर देताना सतिश चांडोळकर यांनी आपल्या प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. धनंजय बाबाराव वडजे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. आज याच क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना अधिकारी घडविण्याचे कार्य करता येत असल्याचा आनंद आणि समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांनी इंजि. जयपाल शिरसाठे, सुनील जाधव आणि इंजि. दिलीप ताटे यांचाही आवर्जून गौरव केला. गेल्या आठ वर्षांपासून शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी सतिश चांडोळकर यांचे अभिनंदन केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version