‘शब्दांची चळवळ’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत!
भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार विमोचन; आंबेडकर भवन येथे साहित्यिकांची मांदियाळी
मुंबई | प्रतिनिधी
‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘शब्दांची चळवळ’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या काव्यसंग्रहाचे विमोचन भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला साहित्य, सांस्कृतिक आणि आंबेडकरी चळवळीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चळवळीतील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास चळवळीचे मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक, राज्य सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अविनाश मनवर, एबीएल प्रकाशक अंकुश सोनवणे, राज्य प्रसिद्धी प्रमुख तथा संपर्कप्रमुख प्राचार्य संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर, राज्य नियोजन समितीच्या रिता रामटेके, शुभांगी गुरचळ, स्वाती चव्हाण, राज्य युवा समन्वयक सागर (दादा) भडकुंबे, कवी सुरेश बनसोडे आणि ज्ञानदेव जाधव सर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच विनया तुरबे, ज्योती कांबळे, विश्वनाथ पडेलकर, अनिल जाधव, रेश्मा सावंत, शैलेश नारायने, मधुकर कांबळे, काशिनाथ गायकवाड, सतीश साखरे, शांतेश जाधव आणि दीप्ती जाधव यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील चळवळीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, कवी, साहित्यप्रेमी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा साहित्यिक सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई समन्वयक जयेश सोळंकी यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली.
