Spread the love

पाळधीत १५ नोव्हेंबरला जीपीएस मित्र परिवारातर्फे भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर!

गरजू रुग्णांची पनवेल येथील आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया; निवास, भोजन आणि प्रवासाचीही व्यवस्था

पाळधी : प्रतिनिधी

जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पाळधी खुर्द येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गरजू रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार असून, शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर पनवेल येथील अत्याधुनिक आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे.

शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांच्या निवासाची, चहा-नाश्ता, जेवण तसेच प्रवासाची संपूर्ण व्यवस्था जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिराचे ठिकाण व वेळ

  • दिनांक : रविवार, १५ नोव्हेंबर २०२६

  • वेळ : सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत

  • ठिकाण : शासकीय विश्रामगृह, मेन रोड, पाळधी खुर्द

या उपक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील आणि युवा नेते विक्रम गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

७५१७५०९०९० / ८९९९३४९००४

Share.
Leave A Reply

Exit mobile version