Spread the love

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सन्मान!

मित्रमंडळींकडून शाल, पुष्पहार आणि भारतीय संविधानाची प्रास्ताविका देऊन गौरव; मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

मुखेड | प्रतिनिधी

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, पुष्पहार आणि भारतीय संविधानाची प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार सोहळ्यास मुखेड अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शंकर बादावाड, ग्रामपंचायत अधिकारी साहेबराव पांडुर्णिकर, प्राचार्य तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संघशिल भद्रे ऊर्फ एस. एन. नांदेडकर सर आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासक कैलासजी लोहबंदे उपस्थित होते.

मित्रमंडळींनी प्रतीक लिंबेकर यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या मेहनतीचे आणि कर्तृत्वाचे अभिनंदन केले. शाल, पुष्पहारासोबतच भारतीय संविधानाची प्रास्ताविका देऊन करण्यात आलेला हा सन्मान विशेष ठरला. यावेळी मान्यवरांनी लिंबेकर यांना पुढील शासकीय सेवाकार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या हातून समाजहिताचे कार्य घडावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version