Spread the love

छावा मराठा युवा महासंघाची जळगाव महानगर व तालुका कार्यकारिणी जाहीर

महानगराध्यक्षपदी उज्वल पाटील, तर तालुकाध्यक्षपदी डॉ. राकेश पाटील यांची नियुक्ती; लवकरच जिल्हा व इतर तालुक्यांच्या कार्यकारिणीची घोषणा

जळगाव | प्रतिनिधी

छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव महानगर आणि जळगाव तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महानगराध्यक्षपदी मेहरूण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक उज्वल सुरेश पाटील, तर तालुकाध्यक्षपदी ममुराबाद येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक डॉ. राकेश एकनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हे यांनी जळगाव महानगर आणि जळगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली.

जळगाव महानगर कार्यकारिणी

महानगराध्यक्षपदी उज्वल पाटील, महानगर उपाध्यक्षपदी सतीश पाटील व संजय सांगळे, महानगर सचिवपदी हितेंद्र टेकावडे, कायदेविषयक सल्लागारपदी ॲड. विक्रम महाले, तर सहसचिवपदी नंदू बडगुजर, जयंत गोंधळी, चंद्रशेखर महाले आणि यशोदीप धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महानगर कार्यकारिणीतील सक्रिय सदस्य म्हणून मनोहर बडगुजर, कल्पेश वाणी, कृष्णा जमदाडे, सागर मोतीराळे, भीमराव सोनवणे, आनंद महीरे, राजू कोळी आणि सागर कुटुंबळे यांचा समावेश करण्यात आला आहे.

जळगाव तालुका कार्यकारिणी

तालुकाध्यक्षपदी डॉ. राकेश पाटील, उपाध्यक्षपदी गणेश तायडे व डॉ. ललित कोतवाल, सचिवपदी मयूर जावळे, तर सहसचिवपदी आचल भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुका कार्यकारिणीतील सक्रिय सदस्य म्हणून डॉ. किरण तायडे, डॉ. विशाल साळुंखे, डॉ. निरज सोनवणे, सचिन पाटील, तन्मय राणे आणि निरंजन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा व इतर तालुक्यांच्या कार्यकारिणीही लवकरच जाहीर होणार

लवकरच जळगाव जिल्हा कार्यकारिणीसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या कार्यकारिणीही जाहीर करण्यात येणार आहेत. समाजकार्याची आवड असलेल्या, जनतेच्या विविध प्रश्नांसाठी तसेच भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याची इच्छाशक्ती असलेल्या इच्छुक कार्यकर्त्यांनी संघटनेत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून जळगाव महानगर आणि तालुका स्तरावर संघटनेचे कार्य अधिक जोमाने व व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 
Share.
Leave A Reply

Exit mobile version