Spread the love

जळगाव : महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात दमदार प्रवेश केला आहे. जळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाल्याने जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात या घडामोडीची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या या निवडीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्था, ग्रामीण पतपुरवठा व्यवस्था आणि सहकार क्षेत्रातील विविध घटकांसाठी जिल्हा बँकेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांना जिल्ह्यातील सहकार क्षेत्राशी अधिक जवळून जोडले जाण्याची संधी मिळणार आहे.

या निवडीच्या पार्श्वभूमीवर जनसम्राट टाइम्सचे मुख्य संपादक आदरणीय मुकुंद नन्नवरे, जगदीश सपकाळे, प्रा. संजय पाटील सर यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी गुलाबराव पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक ताकद आणि प्रशासकीय कामकाजाचा अनुभव यांची जोड आता सहकार क्षेत्रालाही मिळणार असल्याने गुलाबराव पाटील यांच्या या नव्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version