Spread the love

एमबीबीएसनंतर FMGE परीक्षेतही यश; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान!

श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा समितीतर्फे दिनानाथ पाटील व अनिकेत महाजन यांचा गौरव; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक

भडगाव | प्रतिनिधी – गणेश रावळ

श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा समितीतर्फे वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. वाडे येथील सुनील निंबा पाटील (माजी संचालक, ग.स. बँक) यांचे चिरंजीव चि. दिनानाथ सुनील पाटील आणि साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, वडाळा येथील मुख्याध्यापक नंदलाल जगन्नाथ महाजन यांचे चिरंजीव चि. अनिकेत नंदलाल महाजन यांनी एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली येथे FMGE (Foreign Medical Graduate Examination) परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल समितीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात भरारी

ग्रामीण भागात शिक्षण घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय क्षेत्रात यश मिळविणाऱ्या दिनानाथ पाटील आणि अनिकेत महाजन यांच्या कामगिरीचे समितीच्या सदस्यांनी विशेष कौतुक केले. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वैद्यकीय सेवेसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

समितीचे सदस्य व कार्यकर्त्यांची उपस्थिती

यावेळी समितीचे सदस्य नवल एकनाथ पाटील, अखिलेश रविंद्र पाटील, राहुल पाटील, अनिल सुपडू पाटील, संजय रंगराव पाटील, गुलाब रमेश पाटील, नितीन मधुकर पाटील, निलेश सतीश पाटील, अक्षय जगन्नाथ पाटील तसेच सुनील पाटील, किशोर पाटील, अभय पाटील, सुशील पाटील, निखिल पाटील, उमेश पाटील, कुणाल पाटील, कुलदीप पाटील, योगीराज पाटील, सनी पाटील आणि रावसाहेब पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा समितीच्या वतीने त्यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version