Spread the love

नशिराबादचे माजी उपसरपंच गणपत सदाशिव पाटील यांचे निधन

वयाच्या ७३व्या वर्षी अल्पशा आजाराने घेतला अखेरचा श्वास; पाटील परिवारावर शोककळा

नशिराबाद : नशिराबाद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणपत सदाशिव पाटील (वय ७३) यांचे बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नशिराबाद परिसरात शोककळा पसरली आहे.

गणपत सदाशिव पाटील यांनी नशिराबाद ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात त्यांचा परिचय होता. नशिराबादचे माजी सरपंच तथा नगरपरिषदेचे सार्वजनिक बांधकाम सभापती विकास पाटील, महेश पाटील, किरण पाटील आणि निलेश पाटील यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अंत्ययात्रा गुरुवारी

त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पाटील वाडा, नशिराबाद येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!

Share.
Leave A Reply

Exit mobile version