Spread the love

धुळे कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

सरकारी निवासस्थानी प्रकृती बिघडली; रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित, अवघ्या तीन महिन्यांवर होती सेवानिवृत्ती

धुळे : धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एकनाथ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या अचानक निधनामुळे कारागृह प्रशासनासह शासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असतानाच काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे हे सरकारी निवासस्थानी असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. ही बाब लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शिंदे यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अवघ्या तीन महिन्यांनंतर सेवानिवृत्त होऊन सेवेतून निवृत्त होण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे यांचे असे अचानक निधन झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version