Spread the love

भूषण नगरे यांना डॉ. राजेंद्र प्रसाद आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार प्रदान!

आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते जळगावात गौरव; यावलच्या शिरपेचात मानाचा तुरा

यावल (प्रतिनिधी) : यावल येथील भूषण नगरे यांना त्यांच्या उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाची दखल घेत प्रतिष्ठेचा माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. जळगाव येथील अल्पबचत भवन कार्यालयात रविवार, २२ नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून निवड झालेले पुरस्कारार्थी, विविध शासकीय विभागांतील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याला नायब तहसीलदार अमोल सिंधुताई अनशाबा बन (एरंडोल), सहाय्यक कृषी अधिकारी सतीश बाविस्कर (पालघर), शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, शशिकांत पाटील (उपसंपादक, पोलिस टाइम्स), नीता सतीश बाविस्कर (ग्रामपंचायत अधिकारी), हाजी अब्दुल मजीद जकरिया, एकता संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख, हाजी अजमल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

भूषण नगरे यांना हा पुरस्कार प्रदान झाल्याने यावल शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल यावल शहरासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अली अंजुम रिझवी यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह नौमानी तसेच वृत्त प्रभात समूह, जळगाव जिल्हा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version