Spread the love

गरजू रुग्णांसाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठरतेय आशेचा किरण!

अत्यल्प दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा; गरीब रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा

शिर्डी (प्रतिनिधी – Ramchandra Annadate) :

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी संचलित श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ शिर्डी परिसरातीलच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांसह देशभरातून येणाऱ्या गरजू रुग्णांसाठी आशेचा मोठा आधार ठरत आहे. अत्यल्प दरात तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमामुळे या रुग्णालयाचे महत्त्व वाढत आहे.

या रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपचारांसाठी येत असतात. सकाळपासूनच रुग्णालय परिसरात रुग्णांची वर्दळ दिसून येते. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, सुसज्ज तपासणी विभाग आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांना उपचार मिळण्यास मदत होत आहे.

रुग्णालय परिसरातच स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणारे दुकान असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अतिरिक्त धावपळ कमी होत आहे. वैद्यकीय तपासण्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

साईबाबांचा ‘सबका मालिक एक’ हा संदेश आणि मानवसेवेची शिकवण केंद्रस्थानी ठेवून संस्थानामार्फत आरोग्यसेवेचे कार्य केले जात आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, या भावनेतून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version