Spread the love

रावसाहेब रूपचंद विद्यालयात संविधान दिन उत्साहात; २६/११ च्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

संविधान पूजन, सामूहिक वाचन आणि शपथ; विद्यार्थ्यांना मूलभूत हक्क व नागरिकांच्या कर्तव्यांचे मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी : रावसाहेब रूपचंद विद्यालयात गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये, मूलभूत हक्क आणि नागरिकांच्या कर्तव्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गिरीश आर. भावसार होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संविधान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याचे आवाहन

यावेळी उपशिक्षक के. जे. सोनवणे यांनी संविधान दिनाचे महत्त्व, भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास, संविधानातील मूलभूत तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संविधानाची प्रार्थना व शपथ देण्यात आली. संविधानाने दिलेली मूल्ये केवळ जाणून न घेता ती दैनंदिन जीवनात आचरणात आणावीत, असे आवाहनही करण्यात आले.

२६/११ च्या हुतात्म्यांच्या शौर्याला उजाळा

मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त एनसीसी विभागप्रमुख गिरीश महाजन यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या त्याग आणि बलिदानाला त्यांनी उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सामूहिक संविधान वाचन करून संविधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयांशू पोळ यांनी केले.

याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक गिरीश आर. भावसार, शिक्षक एस. आर. पिले, वाय. जी. चौधरी, डी. टी. पाटील, जयांशू पोळ, आर. बी. महाजन, दिवाकर साबळे, दिलीप पाटील, डी. डी. जोशी, बी. क्षीरसागर, पी. आर. श्रावगी, एम. एन. खडसे, सी. एन. पाटील, एल. पी. तायडे मॅडम, एनसीसी विभागप्रमुख गिरीश महाजन, सामाजिक कार्य समिती प्रमुख एम. एन. खडसे, एम. पी. बर्हाटे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version