Spread the love

संविधान दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

धुळे जिल्हा शाखेचा संविधान जागर कार्यक्रम उत्साहात; डॉ. बी. आर. आंबेडकर मल्टिस्टेट बँकेच्या शेअर्सचे वाटप

धुळे : भारतीय बौद्ध महासभा, धुळे जिल्हा शाखेच्या वतीने संविधान दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, संविधान जागर आणि डॉ. बी. आर. आंबेडकर मल्टिस्टेट बँकेच्या शेअर्स वाटपाचा कार्यक्रम गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

धुळे शहरातील मनोहर टॉकीजमागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील धम्मदीप बुद्ध विहार येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुनंद भामरे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ सदस्य बी. यू. वाघ आणि आत्माराम बाविस्कर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण समन्वयक अण्णासाहेब देविदास जगताप यांनी केले. यावेळी प्रणाली मराठी यांनी ‘संविधानाचे महत्त्व’ या विषयावर विचार मांडताना भारतीय संविधानाची मूल्ये, लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांची संविधानाप्रती असलेली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.

संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ. बी. आर. आंबेडकर मल्टिस्टेट बँकेच्या शेअर्सचे वाटपही करण्यात आले. यामुळे कार्यक्रमाला संविधान जागरासोबतच संस्थात्मक सहभागाची जोड मिळाली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार नाशिक विभागीय अध्यक्ष मधुकर निकुंभे यांनी मानले. सरणत्तय ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुनंद भामरे, धर्मदास पवार, रविकांत, खंडारे फौजी, दिनेश चव्हाण सर, नानासाहेब मोरे, सुरज सोनवणे, गौतम सोनवणे, बापू पाटोळे, बापू बाविस्कर, नरेंद्र गव्हाणे सर, यशवंत गायकवाड, आत्माराम बाविस्कर, अनिल इदाईज, शशिकांत देवरे, मधुकर निकुंभे, बी. यू. वाघ, रमेश अहिरे पहलवान, सुरेश जवराळ, चंद्रकांत आण्णा शिंदे, रामदास गोलाईत, दिनकर सोनवणे यांच्यासह महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version