Spread the love

नाशिक (गुरुदत्त वाकदेकर) : कलावंत विचार मंच, नाशिक आणि कमल फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री उद्योग समूह नाशिक यांच्या सौजन्याने आयोजित कलावंत पुरस्कार सोहळा १९ एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात हास्यविद्या वाचस्पती पुरस्कार प्राप्त कु. अजया अजित मुळीक, इयत्ता सातवी, महाराष्ट्र विद्यालय, पुणे, यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुनिल मोंढे यांनी दिली.

या पुरस्कार सोहळ्यास मा. जिल्हाधिकारी तथा प्रसिद्ध लेखक डॉ. बी. जे., तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुभाषजी सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कला, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची रंगत अधिक वाढणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्थळ प. सा. नाट्य मंदिर, नेहरू गार्डन जवळ, नाशिक असे निश्चित करण्यात आले आहे. सांस्कृतिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असल्याने नाशिकच्या कलारसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यस्तरीय स्तरावर होत असलेल्या या सन्मानामुळे युवा कलावंतांना प्रेरणा मिळणार असून, विविध कलाक्षेत्रांतील गुणवंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version