Spread the love

पुणे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची महत्त्वपूर्ण रिपब्लिकन वर्किंग कमिटी बैठक पुणे येथे उत्साहात पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
बैठकीदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणावर, आगामी राजकीय रणनीतीवर तसेच विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवणे, पक्ष विस्तारासाठी नव्या योजना राबविणे यावर विशेष भर देण्यात आला.

या वेळी रिपब्लिकन वर्किंग कमिटीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version