Spread the love

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत अकस्मात उभारण्यात आलेला महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा अखेर आज हटविण्यात आला.स्मशानभूमीसारख्या जागेत महामानवाचा पुतळा उभा करून सबंधितांना काय संदेश द्यावयाचा होता हे अद्याप कोडेच आहे.

हा पुतळा यथायोग्य जागेत उभारण्यात यावा या मागणीसाठी उल्हासनगरमधील सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर मागील सहा दिवसांपासून आपल्या निवासस्थानी उपोषणाला बसले होते .त्यांना अनेक सामाजिक राजकीय पक्षसंघटनांनी पाठींबा दिला होता.मग झारीतील शुक्राचार्य कोण होते हे यथावकाश बाहेर येईलही, परंतु हा करण्यात आलेला प्रकार कोणालाही रूचलेला नाही हे मात्र नक्की.
मुंबईत चेंबूर चरई येथील स्मशानभूमीतही कालीमाता ,म्हस्कोबा आदींची मंदीरे अनधिकृतपणे उभी करून त्या ठिकाणी अघोरी प्रकार , जादूटोणा , सारखे प्रकार अव्याहतपणे सुरूआहेत. भंडारा , नाचगाणी व मद्यप्राशन असले प्रकार देखील याच स्मशानभूमीत सुरू असतात याचा त्रास स्मशानात अंत्यविधीसाठी येणा-या दुःखितांना होत असतो .

सदर ठिकाणी दानपेटी ठेवण्यात आली असून त्यांतील जबरदस्तीचे टाकले गेलेले दान सबंधित पुजारी व एक राजकीय पुढारी नित्यनेमाने घेऊन जात असल्याची चर्चा आहे.यासंदर्भात एम वाॅर्ड महानगरपालिका व चेंबूर पोलीसांत लेखी तक्रारी झाल्या असतानाही अंधश्रध्देला खतपाणी घालणारी ही तथाकथित मंदिरे अद्याप हटविण्यात आलेली नाही.उल्हासनगर मधील पुतळ्यासाठी राज असरोंडकर यांना उच्च मधुमेह असतानाही सहा दिवसांचे उपोषण आंदोलन करावे लागले .तेव्हा यंत्रणेला जाग आली. या यशाबद्दल असरोंडकर यांचे व त्यांच्या पाठीशी उभे राहणा-यांचे खुप खूप अभिनंदन.

आता चेंबूरमधील स्मशानभूमीत चालणारी अघोरी कृत्ये व नाचगाण्यांवर बंदी घालणे व अंधश्रध्देला खतपाणी घालणारी मंदीरे व दानपेट्या हटविण्यासाठी मुंबईतून देखील सबंधित यंत्रणा एखादा राज असरोंडकर आंदोलनासाठी उभा राहण्याची वाट पाहत आहे काय??

राजू झनके
9372343108

Share.
Leave A Reply

Exit mobile version