Spread the love

शिवसेनेची आक्रमक ‘पॉवर ब्लूप्रिंट’; २२ जिल्ह्यांची जबाबदारी १२ मंत्र्यांकडे

मुंबई (प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सत्तेवर झेप घेण्यासाठी आक्रमक ‘पॉवर ब्लूप्रिंट’ जाहीर केली आहे. राज्यातील २२ जिल्हा परिषद व २२५ पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळवण्याच्या उद्देशाने पक्षाने १२ प्रमुख मंत्र्यांच्या खांद्यावर २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव आणि नंदुरबार या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नंदनवन’ या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला खासदार Shrikant Shinde, माजी आमदार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पक्षाने “जिंका, अन्यथा पर्याय नाही” असा स्पष्ट संदेश देत मंत्र्यांना निवडणूक तयारीत कोणतीही ढिलाई नको, असे निर्देश दिले. मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिवसेनेने यावेळी राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रत्येक संपर्क मंत्र्याला दोन जिल्ह्यांची जबाबदारी देत निवडणूक व्यवस्थापन अधिक काटेकोर आणि परिणामकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version