Spread the love

२४ विद्यार्थ्यांना ईश्वरविज्ञान पदवी प्रदान; ८४ वर्षीय रजनी साळवे यांचे विशेष कौतुक

पुणे : पुणे येथील आगापे इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित पदवीदान सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ईश्वरविज्ञान (Theology) अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कॅम्प परिसरात आयोजित या कार्यक्रमात प्रिन्सिपॉल जोमन मॅथ्यूज आणि डॉ. डब्ल्यू. एस. ॲनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पास्टर रॉबिन महाडकर, पास्टर अनिल गडकरी, पास्टर राजेश केळकर आणि बिशप प्रदीप वाघमारे उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
या सोहळ्यात जॉइल्स त्रिभुवन, संगीता आरसूड, अंजना गुरव आणि मारिया देठे यांना गुणवत्तेसाठी विशेष सन्मानित करण्यात आले.

८४ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणादायी कामगिरी
विशेष म्हणजे, ८४ वर्षीय रजनी साळवे यांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून उपस्थितांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पास्टर राजेश केळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रजनी साळवे यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version