Spread the love

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान सोहळा; शाल-श्रीफळ देऊन कामगारांचा सत्कार

जळगाव  : महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि जागतिक कामगार दिन या दुहेरी औचित्याचे औचित्य साधत जळगावात शिवसेनातर्फे कष्टकरी कामगारांचा विशेष सन्मान करण्यात आला. येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात १ मे रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र गवळी यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कामगारांच्या कष्टांना सलाम
ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता समाजव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. “कामगार हा केवळ अर्थव्यवस्थेचा घटक नसून समाजाचा आधारस्तंभ आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

शाल-श्रीफळ देऊन गौरव
उपस्थित कामगारांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी आणि श्रमाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश होता.

सामाजिक बांधिलकीचा संदेश
या उपक्रमामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, श्रमाचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सामाजिक एकोपा आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम आदर्श ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

शिवसैनिकांची उपस्थिती
या कार्यक्रमास राजेंद्र सपकाळे, सागर गवळी, दीपक पाटील, शुभम गवळी, चेतन परदेशी, विजय भाटी, सोनू तायडे, अमोल जगताप, विशाल निकम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version