Spread the love

४ ते ११ मे दरम्यान धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन

नशिराबाद : नशिराबादचे ग्रामदैवत प.पू. श्री झिपरु अण्णा महाराज यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त ४ मे ते ११ मे २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त ह.भ.प. श्री. गोपाळ महाराज गारमोडे यांच्या रसाळ वाणीतून ‘श्री नवनाथ भक्तिसार’ कथेचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ध्वजारोहणाने सोहळ्याचा शुभारंभ
सोमवार, दि. ४ मे रोजी सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने उत्सवाची सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव साजरा केला जाईल. दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत कथामृताचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

महत्त्वाचे धार्मिक विधी
७ मे (गुरुवार): सकाळी ९.३० ते ११.३० – श्रींच्या पोथीचे पारायण
९ मे (शनिवार): सकाळी ९ ते ११ – श्रीमद् भगवद्गीता सामूहिक पारायण
१० मे (रविवार): सकाळी ७.३० – सत्यनारायण महापूजा; सकाळी १० ते १२ – कीर्तन व सत्संग

पालखी मिरवणूक व महाप्रसाद
सोमवार, दि. ११ मे रोजी सोहळ्याची सांगता होणार असून सकाळी ७ वाजता श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येईल. त्यानंतर काल्याचे भजन होऊन दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

भजनी मंडळांचा सहभाग
या सोहळ्यात श्री मुक्तेश्वर मंदिर, श्री सावता महाराज मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री ज्ञानेश्वर मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर येथील भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.

भाविकांना आवाहन
नशिराबाद व परिसरातील भाविकांनी या पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घ्यावा, तसेच धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version