Spread the love

शिवसेना शिंदे गटाचे पुणे बार असोसिएशन अध्यक्षांना निवेदन; कठोर शिक्षेची मागणी

पुणे  : भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार व खून प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पुणे शहराच्या वतीने आरोपीविरोधात कठोर भूमिका घेत पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात आरोपीला कोणत्याही वकिलांनी वकीलपत्र स्वीकारू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या गंभीर प्रकरणात न्यायालयाने जलदगतीने सुनावणी करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, विशेषतः मृत्युदंडाची शिक्षा ठोठावावी, अशी ठाम भूमिका शिवसेनेने मांडली.

पुणे बार कौन्सिल असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळूराम भुजबळ यांना हे निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पुणे शहर समन्वयक शंकर संगम, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे शहर प्रमुख रोहित उर्फ बापू कसबेकर, पुणे जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल गडकरी, उपशहर प्रमुख सुनील जाधव, संजय डोंगरे, शहर संघटक अनिल बटाने, निलेश जगताप, मागासवर्गीय शहर प्रमुख महेंद्र गायकवाड यांचा समावेश होता. या घटनेमुळे समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा घटनांना आळा बसावा, यासाठी सर्व स्तरातून मागणी जोर धरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version