Spread the love

तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सर्वंकष प्रशिक्षण; मर्यादित प्रवेश, लवकर नोंदणीचे आवाहन

मुंबई : जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ आणि ‘झुंजार लेखणी’ या पुरोगामी विचारांच्या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ‘मूकनायक’ उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुकांसाठी ही कार्यशाळा पत्रकारितेचे सखोल आणि सर्वंकष ज्ञान देणारी ठरणार आहे.

या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक-राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, वरिष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, प्रा. हेमंत सामंत, दिवाकर शेजवळ, अनिल गलगली, विलास बडे आणि सुरज भोईर हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवातून नवोदितांना पत्रकारितेचे बारकावे शिकण्याची संधी मिळणार आहे.

अभ्यासक्रमात काय असेल?
या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात पत्रकारिता क्षेत्रातील विविध महत्त्वाचे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत—

पत्रकारिता म्हणजे काय, नीतिमूल्ये व कर्तव्य

व्यक्तिमत्त्व विकास व प्रभावी संवाद कौशल्य

कॅमेरा हाताळणी व छायाचित्रण कौशल्य

बातमी लेखन, आशयलेखन व रिपोर्टिंग तंत्र

सामाजिक, राजकीय व शोध पत्रकारिता

गुन्हेगारी पत्रकारिता व मुलाखत तंत्र

मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांची ओळख

वर्तमानपत्र नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

आयोजनात अनेक मान्यवरांचा सहभाग
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष आंबेकर, मोहन जाधव, दिलीप नारद, डॉ. प्रभाकर कांबळे, गुरुदत्त वाकदेकर, मनीषा मांढरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत आहेत. तसेच मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती, माणुसकी फाउंडेशन आणि मराठी साहित्य व कला सेवा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

नोंदणीसाठी आवाहन
कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९६९६ ८६०१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही कार्यशाळा पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version