Spread the love

१०० टक्के निकालासह ९२.२० टक्क्यांची उल्लेखनीय कामगिरी; खुशी मोरे प्रथम

बोरगाव धरणगाव (विजय पाटील) : सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय या विद्यालयाने एस.एस.सी. परीक्षेतील उल्लेखनीय यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयाने शंभर टक्के निकालाची नोंद करत ९२.२० टक्के इतकी दमदार गुणवत्ता मिळवली आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी विद्यालयातून एस.एस.सी. परीक्षेसाठी एकूण ६३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि सर्व ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी तब्बल ५१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मिळवले, तर ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले. यामध्ये कु. खुशी ईश्वर मोरे हिने ९२.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. गायत्री योगेश मराठे हिने ९१.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर चि. भावेश विनोद पवार याने ९१ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच चि. मयूर विजय सूर्यवंशी याने ९०.६० टक्के आणि कु. साक्षी कैलास पाटील हिने ९०.२० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

मेहनत, मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य
विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश महानुभाव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
विद्यालयाचे चेअरमन मनोज पाटील, संस्थेचे अध्यक्ष, सदस्य तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बोरगाव बुद्रुक आणि बोरगाव खुर्द परिसरातूनही यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version