Spread the love

वैष्णवी भंगाळे प्रथम; गुणवत्तेत मुलींची चमकदार कामगिरी

यावल (राहुल जयकर) : जे. टी. महाजन इंग्लिश School या व्यास शिक्षण मंडळ संचालित विद्यालयाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची छाप उमटवली असून विशेषतः मुलींनी गुणवत्तेत बाजी मारली आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. वैष्णवी युवराज भंगाळे हिने ९०.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. तनुश्री कैलास अहिरे हिने ९० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. योगिनी गणेश जावळे हिने ८९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच कु. निधी पंकज पाटील हिने ८७.४० टक्के आणि कु. प्रांजल श्रीकांत पाटील हिने ८५.६० टक्के गुण मिळवत विशेष प्रावीण्य मिळविले.

शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन, मुख्याध्यापिका रंजना महाजन, दीपाली धांडे, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य या त्रिसूत्रीमुळे हे यश शक्य झाल्याचे मत विद्यालय प्रशासनाने व्यक्त केले. विद्यालयाच्या शंभर टक्के निकालामुळे यावल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version