Spread the love

ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्हीत संशयित कैद; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अट्रावल (जगदीश सपकाळे) : अट्रावल येथे केळी व्यावसायिकाच्या दुकानातून ५० हजार रुपये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अट्रावल येथील केळी व्यापारी सुधाकर तायडे यांच्याकडे केळी सप्लायरने ५० हजार रुपये आणून दिले होते. तायडे यांनी ही रक्कम दुकानातील तिजोरीत ठेवली; मात्र घाईगडबडीत तिजोरी लॉक करणे राहून गेले. त्यानंतर काही वेळाने पैसे गायब झाल्याचे लक्षात आले.

संशयिताकडे विचारपूस
दुकानात उपस्थित असलेल्या एका संशयित तरुणाकडे विचारपूस करण्यात आली असता त्याने चोरी केल्याचे नाकारले. मात्र, घटनेनंतर ग्रामपंचायतीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संशयित आरोपी युगेन चौधरी हा स्पष्टपणे दिसून आल्याचे समोर आले.

पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रंगनाथ धारबडे करीत आहेत. चोरीच्या घटनेमुळे अट्रावल परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version