Spread the love

राजेश वाघमारे यांच्या पाठपुराव्याला यश; महिला, विद्यार्थी व कामगार वर्गात आनंदाचे वातावरण

कल्याण (संदीप शेंडगे) : मोहोने परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने मोहोने–खडकपाडा–दुर्गाडी या नव्या बससेवेचा शुभारंभ मंगळवारी उत्साहात करण्यात आला. मोहोने गेट येथे सकाळी १० वाजता महिला, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या बससेवेचे उद्घाटन झाले. या नव्या सेवेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून महिला व कामगार वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

मोहोने टिटवाळा ब्लॉक अध्यक्ष तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश विष्णु वाघमारे यांनी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार, बैठका आणि चर्चा करून ही बससेवा मंजूर करून घेतली. या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या कामासाठी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ पातकर, काँग्रेस पदाधिकारी आणि परिवहन विभागाचे सहकार्य लाभल्याचे राजेश वाघमारे यांनी सांगितले. “ही बससेवा सुरू झाल्याने मोहोने परिसरातील नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. विशेषतः महिलांना, विद्यार्थ्यांना आणि कामगारांना याचा मोठा फायदा होईल,” असे त्यांनी नमूद केले.

या नव्या बससेवेचा लाभ खडकपाडा, आधारवाडी आणि दुर्गाडी परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षा रक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दुर्गाडी देवस्थान आणि दुर्गाडी किल्ला परिसरात जाणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठीही हा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

जिल्हाध्यक्ष राजेभाऊ पातकर यांनी सांगितले की, “सार्वजनिक वाहतूक सेवा मजबूत झाल्यास सामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होते. ही बससेवा म्हणजे मोहोने परिसरासाठी महत्त्वाचा टप्पा आहे.”

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी
ज्येष्ठ काँग्रेस नेते मामा पगारे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दशरथ पाटील, माजी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विष्णु वाघमारे, मोहोने ग्रामस्थ मंडळ प्रमुख सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुरेश सोनार, विजय परियार, नाना भालेराव, संध्या ठोसर, काँग्रेसचे एस.सी सेलचे जिल्हाध्यक्ष अँड. अजिंक्य साळवे, नागेश भोईर, हरिश्चंद्र पाटील, अशोक काळपुंड, राजेश दीक्षित, वेंकटेशन, अशपाक शेख, बाळा बर्वे, विवेक घोडके, अजय रामचंद्रन, धर्मांना मेडी, उर्मिला भोईर, अश्विनी वाघमारे, सुजाता वाघमारे, दर्शना पानपाटील, मेहनाज शहा, वर्षा माने, रंजना उपदेशे, निर्मला गोडबोले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश कोनकर, रमेश रोकडे, पांडुरंग वाघमारे, विजय बोरे, रोहिदास भालेराव आरपीआय पक्षाचे रमेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते रमेश नंबियार, बौद्धाचार्य गौतम मोरे, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तम शेंडगे व इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व मोहोने शहरातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी या बससेवेचे स्वागत करत भविष्यात आणखी फेऱ्या वाढवण्याची मागणीही यावेळी केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version