आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून साकार होणार आकर्षक आणि हिरवेगार उद्यान
भडगाव (गणेश रावड) : भडगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आकर्षक ठिकाण ठरणारे आधुनिक “नमो गार्डन” लवकरच साकार होणार आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये उभारण्यात येणाऱ्या या भव्य-दिव्य गार्डनच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साकारत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र जिभू पाटील, पाचोरा नगरपालिकेचे गटनेते सुमितदादा पाटील, भडगाव नगरपालिकेचे गटनेते लखीचंद भाऊ पाटील, बांधकाम सभापती नगमा बी. अलिम शहा, प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका सौ. समीक्षाताई पाटील आणि नगरसेवक अमोलभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, शिवसैनिक तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन सोहळ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विकासकामाचे स्वागत केले.
हे “नमो गार्डन” आधुनिक सुविधा, आकर्षक रचना आणि हिरवाईने नटलेले असणार असून नागरिकांसाठी सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, मुलांच्या खेळासाठी आणि कुटुंबांसाठी एक सुंदर विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार आहे. शहराच्या विकासात हे उद्यान आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
कार्यक्रमास नगरसेवक युवराज पाटील, विजयकुमार भोसले, संतोष पाटील, विशाल पाटील, इम्रानअली सैय्यद, डॉ. प्रमोद पाटील, सुधाकर पाटील, समाधान पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश भंडारी, आबा चौधरी, बबलू देवरे, जहागीर मालचे, महेंद्र ततार, निशांत सोमवंशी, सागर शेंडे, प्रितम भंडारी, गौतम मारवाडी आदी मान्यवर उपस्थित होते. भडगाव शहरातील नागरिकांसाठी लवकरच हे आधुनिक आणि हिरवागार “नमो गार्डन” आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
