Spread the love

मुंबईत आरोग्य जनजागृतीसह काष्ठशिल्प प्रदर्शनाचेही आकर्षण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटर आणि पार्किन्सन’स डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी पु. ल. देशपांडे अकॅडमी येथे “पार्किन्सनवर बोलू काही” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पार्किन्सन आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन
या चर्चासत्रात पीडीएमडीएसच्या डॉ. अंजुम तडवी यांनी पार्किन्सन आजाराची लक्षणे, त्यावरील काळजी, उपचारपद्धती आणि व्यवस्थापन याविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या माहितीपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये आजाराबाबत जागरूकता निर्माण झाली.

शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग
मुंबई प्रादेशिक विभागातील जवळपास शंभर ज्येष्ठ नागरिकांनी चर्चासत्रात सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

काष्ठशिल्प प्रदर्शनाचे विशेष आकर्षण
कार्यक्रमासोबतच काष्ठशिल्पकार शंकरबाबा पापळकर यांच्या काष्ठशिल्पांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी मोठी पसंती दिली.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास फेस्कोम कोकण विभागाचे माजी अध्यक्ष शरद डिचोलकर, आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभागाच्या प्रमुख दिपिका शेरखाने व मनिषा खिल्लारे उपस्थित होत्या. तसेच पु. ल. देशपांडे कला अकादमी च्या संचालक मीनल जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कला अकादमीच्या प्रमुख वर्षा कराळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

आरोग्य जनजागृतीसाठी उपयुक्त उपक्रम
उपयुक्त माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सामाजिक सहभाग यामुळे हे चर्चासत्र यशस्वी ठरले. या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version