Spread the love

६५ कंपन्या आणि ७०० उमेदवारांचा सहभाग; ऑनलाइन-ऑफलाइन माध्यमातून भव्य आयोजन

पुणे (शंकर जोग) : रोजगाराच्या वाढत्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या JITO National Job Fair 2026 ला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. JITO Pune Chapter चे चेअरमन इंद्रकुमार छाजेड आणि मुख्य सेक्रेटरी दिनेश ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य जॉब फेअर यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे सुमारे ३०० उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

या जॉब फेअरमध्ये देशभरातील जवळपास ६५ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तसेच सुमारे ७०० उमेदवारांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून नोंदणी करून मुलाखती दिल्या. विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध झाल्याने युवकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. या यशस्वी आयोजनामागे JITO जॉब्स पुणेचे डायरेक्टर उमेश बोरा, निमंत्रक महेंद्र सुंदेचा मुथा आणि पराग दोशी यांचे विशेष योगदान राहिले. रोजगार मेळाव्याचे नियोजन, कंपन्यांशी समन्वय आणि उमेदवारांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे सांभाळली.

हा कार्यक्रम कृष्णा डायग्नोस्टिक्स यांच्या प्रायोजकत्वाखाली पार पडला. कृष्णा डायग्नोस्टिक्सचे राजूभाई मुथा, पल्लवी जैन आणि यशजी मुथा यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि प्रभावी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाला JITO अपेक्सकडून प्रेसिडेंट विजय भंडारी, एपेक्स डायरेक्टर राजेश साकला, प्रियांक परमार आणि सुजीत भटेवरा यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.

यावेळी पुणे चॅप्टरमधील मनोज छाजेड, अजय मेहता, रवींद्र दुगड, अमित भटेवरा, प्रवीण चोरबेले, आनंद चोरडिया, अनिल भन्साळी, खुशाली चोरडिया, JITO यूथ चेअरमन आकाश ओसवाल, लेडीज विंग चेअरमन एकता भन्साळी, सेक्रेटरी रीताजी जैन, ट्रेझरर वंदनाजी राठोड, पूनम ओसवाल आणि लकीशाजी मंडलेचा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच ROM Job Convener अमित लोढा यांचेही या आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान राहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सोनिका शहा, सी.ए. प्रवीण शहा, प्रकाश बोरा, दिनेश मेहता, सचिन शहा, कुणाल ओस्तवाल, प्रणव जैन, प्रणय भंडारी, सोनिया लोढा आणि शीतल गादिया यांच्यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.

या जॉब फेअरसाठी बिबवेवाडी येथील श्री वर्धमान श्वेतांबर स्थानक आणि यश लॉन यांनी जागा उपलब्ध करून दिली होती. उमेदवार आणि कंपनी प्रतिनिधींसाठी नाश्ता, दुपारचे जेवण तसेच हाय-टीची उत्कृष्ट व्यवस्था JITO तर्फे विनामूल्य करण्यात आली होती. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच युवकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न भविष्यातही सुरू राहणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version