पुण्यात रेकी, एंजल हीलिंग आणि टॅरो क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा गौरव; १७ वर्षीय शिवांश तांडेकर यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन
पुणे (शंकर जोग : पुणे येथे नुकताच Vertex Healing Centre तर्फे श्रेयस बँकेट येथे भव्य-दिव्य पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सकारात्मक ऊर्जा, आध्यात्मिक विकास आणि वैयक्तिक प्रगतीचा संदेश देणाऱ्या या विशेष समारंभात विविध क्षेत्रातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या संचालिका डॉ. मंजुषा तांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रेकी ग्रँड मास्टर, एंजल मास्टर ट्रेनर, मनी रेकी ग्रँड मास्टर तसेच प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडर्स यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे अवघ्या १७ वर्षीय शिवांश तांडेकर लिखित “The Things Teenagers Don’t Say” या पुस्तकाचे प्रकाशन होय. तरुण पिढीच्या भावना, विचार आणि मनातील न बोलल्या जाणाऱ्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन करण्यात आले. उपस्थितांनी या पुस्तकाचे विशेष कौतुक केले.
या सोहळ्यास आयुष्यमुळेचे अध्यक्ष डॉ. राजन संचेती, विंभ पब्लिकेशनचे संचालक दीपक प्रभात, नागपूर येथील भारतीय मजदूर कामगार संघाचे शंकरराव पहाडे, तसेच योगराज काटबरी, शारदा काटबरी, डॉ. सुवर्णा सुर्वे आणि महेश कुमार तांडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले.
गेल्या अनेक वर्षांपासून Vertex Healing Centre हे केंद्र लोकांच्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि मानसिक सकारात्मकता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. डॉ. मंजुषा तांडेकर यांनी तयार केलेले विद्यार्थी आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आणि विदेशातही विविध क्षेत्रांत कार्यरत असून समाजात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. मानसिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासाच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता रुजविण्याचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.
