Spread the love

प्रतिमापूजन, अभिवादन आणि महाप्रसाद वितरण; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

पाळधी बुद्रुक : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे श्री संत शिरोमणी भीमा भोई जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त भोई समाज युवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांनाही पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, शेतकी संघाचे संजय महाजन, अहमद शेठ, मज्जित शेठ, गोपाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांचे भोई समाज युवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमात समाजबांधवांसह महिला भगिनींचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रतिमापूजन आणि अभिवादनानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललित मोरे, महेश मोरे, विठ्ठल भोई, सुरेश मोरे, कांतीलाल भोई, रमेश भोई, काशिनाथ भोई, नरेश भोई, तेजस भोई, मनोज भोई, वैभव भोई, योगेश भोई, विनोद भोई, गणेश भोई, जयवंत पवार, आरुष मोरे, क्रांती सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version