Spread the love

मराठा मंगल कार्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण; पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार

भुसावळ (संघरत्न सपकाळे) :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वरणगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठा मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ विधानसभा अध्यक्ष दीपक मराठे होते. सकाळी ९ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून विकासाभिमुख राजकारण करण्याची ग्वाही देण्यात आली.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मराठा मंगल कार्यालय परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मतही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, वरणगाव शहराध्यक्ष प्रा. राहुल जोहरे, गटनेते इरफान सय्यद, नगरसेवक निलेश चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष डॉ. आहेसान अहमद, अल्पसंख्यांक तालुका कार्याध्यक्ष जुनेद शाह, समाज माध्यम प्रमुख जिशान खान, शहर उपाध्यक्ष वसीम शेख, अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष शाहरुख खान, जितेंद्र तावडे, विनायक शिवरामे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, विविध पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम राजकीय उपक्रमासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version