Spread the love

रावेर लोकसभा मतदारसंघातील संघटन बांधणीची जबाबदारी; युवकांना पक्षाशी जोडण्याचा निर्धार

जळगाव : शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना संसदीय नेते, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ देण्यासाठी विश्वजितराजे मनोहर पाटील यांची युवासेना जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नियुक्तीनंतर विश्वजितराजे पाटील यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्व वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. युवासेना कार्याध्यक्ष भाईसाहेब पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे आणि सचिव किरण साळी यांनी आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

यावेळी त्यांनी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख आमदार तुकाराम काते, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे, धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, मार्गदर्शक डॉ. मनोहर पाटील, जामनेर तालुकाप्रमुख ॲड. भरत पवार तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

याशिवाय युवासेना विभागीय सचिव अविष्कार भुसे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश पाटील, कार्यकारिणी सदस्य किशोर भोसले, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख शर्मिला येवले आणि जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख निखिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना विश्वजितराजे पाटील म्हणाले, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा तसेच हिंदुत्वाच्या भूमिकेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी संघटन विस्तार, युवकांना पक्षाशी जोडणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे हेच माझे प्रमुख ध्येय राहील.”

रावेर लोकसभा क्षेत्रातील जामनेर, भुसावळ, चोपडा आणि यावल या विधानसभा मतदारसंघांमध्ये युवासेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात युवकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडून संघटन अधिक व्यापक करण्यासाठी विश्वजितराजे पाटील सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version