Spread the love

2026-27 वर्षासाठी बिनविरोध निवड; शुभ अग्रवाल सचिव तर संजय जालान खजिनदारपदी विराजमान

पुणे | प्रतिनिधी (शंकर जोग)

लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनच्या 2026-27 या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली. यामध्ये विनोद कुमार अग्रवाल यांची पुणे शहराध्यक्षपदी, शुभ अग्रवाल यांची सचिवपदी आणि संजय जालान यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर क्लबच्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. समाजोपयोगी आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून क्लबचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बैठकीत आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक जनजागृती तसेच गरजू घटकांसाठी विविध सेवा प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजहिताच्या उपक्रमांना अधिक गती देत नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश सुरेंद्रकुमार अग्रवाल, माजी अध्यक्ष रवी अग्रवालराजेश बन्सलसीमा मनोज अग्रवाल यांच्यासह क्लबचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करत विविध लोकहितकारी उपक्रम राबवेल, असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version