Spread the love

३२० गुणांसह चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षा उत्तीर्ण; जळगावच्या सुपुत्राचे उल्लेखनीय यश

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव येथील रहिवासी तसेच गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कमर्शियल हेड म्हणून कार्यरत असलेले सीए सुरेश मंत्री यांचे सुपुत्र ऋषी सुरेश मंत्री यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दोन्ही गटांमध्ये एकूण ३२० गुण मिळवत त्यांनी कुटुंबासह जळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

देशातील सर्वाधिक कठीण आणि प्रतिष्ठेच्या व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते. ऋषी यांनी मुंबई येथील नामांकित चतुर्वेदी अँड शाह चार्टर्ड अकाउंटंट्स या संस्थेमध्ये आर्टिकलशिप पूर्ण केली. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले.

ऋषी यांच्या या यशामुळे मंत्री कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या यशाचे श्रेय देताना ऋषी यांनी आई-वडील, गुरुजन, आर्टिकलशिपदरम्यान लाभलेले मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचा विशेष उल्लेख केला. “समर्पण, सकारात्मक दृष्टिकोन आणि अथक प्रयत्न यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

ऋषी मंत्री यांचे हे यश सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.

अभिनंदनाचा वर्षाव
ऋषी मंत्री यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version