Spread the love

विद्यार्थ्यांनी सादर केली विविध योगासने; निरोगी जीवनासाठी योग अंगीकारण्याचा संदेश

पारोळा | प्रतिनिधी : संदीप पाटील

लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित तथा पारोळा शहरातील एकमेव सीबीएसई संलग्न बोहरा सेंट्रल स्कूल येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राधेश्याम चौधरी (भाजप जिल्हाध्यक्ष), रोहन मोरे (उपनगराध्यक्ष), अतुल पवार (भाजप मंडळ अध्यक्ष), कृतिका आफ्रे (भाजप महिला अध्यक्षा) आणि अनिल टोळकर (व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष) उपस्थित होते.

🌿 योगसाधकांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांचे प्रात्यक्षिक

पतंजली जिल्हा योग समितीचे प्रभारी मुकुंद बोहरा, योगशिक्षक प्रा. विकास सोनवणेसोनजेभगवान अमृतकर तसेच योगसाधक अतुल पवार, अनिल तांबट, विजय पाटील, संदीप कासार, दत्तात्रय महाजन, राजेंद्र अमृतकर, प्रकाश पाटील, सुनील भोई, प्रसाद भदान, नरेंद्र भदान, राजेंद्र चौधरी आणि कांतीलाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, कपालभाती, अनुलोम-विलोम, चक्रासन, वज्रासन, शीर्षासन आणि हास्यासन यांसारख्या विविध योगप्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

🎓 मान्यवरांचे मार्गदर्शन

यावेळी संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, प्राचार्या रीयंका अरझारे, व्हाईस प्रिन्सिपल स्मिनीला, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉ. राधेश्याम चौधरी यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. “योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीचा पाया आहे,” असे ते म्हणाले.

✨ निरोगी जीवनाचा संकल्प

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या रीयंका अरझारे यांनी सर्व मान्यवर, योगसाधक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानत जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “योग करा, निरोगी रहा” हा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version