Spread the love

 भुसावळात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ | प्रतिनिधी

शूरवीर, राष्ट्रनायक आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचे नेतृत्व जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा जयश्री पाटील आणि उपाध्यक्षा प्रतीक्षा पाटील यांनी केले.

जयंतीनिमित्त शहरात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. उपस्थित समाजबांधवांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठ कार्याला अभिवादन केले.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

यंदाच्या जयंती सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग. समाजातील महिला वर्गाने विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत जयंती उत्सवाला वेगळीच शोभा आणली.

मुलींच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

कार्यक्रमादरम्यान मुलींनी सादर केलेल्या साहसी आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. या प्रात्यक्षिकांना नागरिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष समाधान महाजनसुरतसिंह पाटीलदिलीपसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पाटील, चोरवड-खेडीचे सरपंच भैया महाजनदीपक भोळे, वराडसीमचे उपसरपंच विजय पाटील, खडका येथील पोलीस पाटील दारासिंग पाटीलजितू पाटील, करणी सेनेचे प्रवीणसिंह पाटीलसंजना राजपूतसंदीप ठाकूरबापू राणाशिवचरण निकम, शिवसेना तालुकाध्यक्षा वर्षा तल्लारेसंग्रामसिंह पाटीलबी.एन. पाटीलआनंदा राजपूत यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

फेटा बांधून सन्मान, थंड पेय व आइस्क्रीमचे वाटप

समाजसेवक राजू राजपूत यांच्या वतीने उपस्थित समाजबांधवांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. तसेच प्रसिद्ध उद्योजक प्रशांत राजपूत यांनी सर्व उपस्थितांसाठी थंड पेय आणि आइस्क्रीमचे वाटप करून जयंती उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

आयोजकांचे आभार

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दामोदर राजपूत, संदीप राणा, सारिका पाटील, जयश्री पाटील, प्रतीक्षा पाटील, मीना पाटील, कविता पाटील, वीरेंद्र पाटील आणि गणेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित समाजबांधवांचे आभार मानले.

“महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या जयंती सोहळ्यातून करण्यात आला.” ⚔️🚩

Share.
Leave A Reply

Exit mobile version