जी.पी. मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम; दोनगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांमध्ये आनंद
दोनगाव बु. : राज्याचे मंत्री तथा लोकप्रिय नेते गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी.पी. मित्र परिवार, दोनगाव बु. यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दोनगाव येथे विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व विविध शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासुदेव गणपत पाटील होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाटेश्वर पवार, वासुदेव पाटील सर, सुरेश पवार, संजय पवार सर, माजी पोलिस पाटील मच्छिंद्र आप्पा, शिवाजी रूपचंद पाटील, राजेंद्र लोटन पाटील, पुरुषोत्तम आप्पा, सुनील आबा, किशोर तात्या महाराज, भगवान वानखेडे, माजी उपसरपंच जितेंद्र कौतिक पाटील (लालू), मनोज सुरेश पाटील (आप्पा), भगवान आबा, भावलाल दादा, संदीप आसाराम पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतीलाल खोंडे, योगेश मच्छिंद्र पाटील, कैलास अर्जुन पाटील, दीपक शांताराम पाटील, गुलाबराव सिताराम पाटील, समाधान युवराज पाटील (खंडा), नितीन अर्जुन पाटील (संभा), भगवान पाटील, रमाकांत पाटील आणि चंद्रभान पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
