Spread the love

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा

धुळे | प्रतिनिधी

राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे तसेच त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाद्वारे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. सामाजिक न्याय आणि संविधानिक तरतुदींनुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका महासंघाने मांडली.

यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश बोरसे, कार्याध्यक्ष संजय लोंढे, सचिव लक्ष्मीकांत चव्हाण, कोषाध्यक्ष प्रकाश पवार, महिला संघटक बबीता पटलेमाया बिर्हाडगेविजय निकुंभविशाल सांगळेमोहनीश सानेसंगिता दाभाडेसुनिल ठाकरेनिता दाभाडेमनिषा पाटीलकपिल चव्हाणसचिन माळीभरत माळीजगदीश शिंदेबिपीन धाकडवृषभ कुवर यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version