Spread the love

निसर्गमित्र समितीतर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सन्मान; विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याची दखल

धुळे येथील राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक समितीचे अध्यक्ष, स

कल मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी

राजेंद्र काळे पाटील यांना निसर्गमित्र समिती, धुळे यांच्या वतीने प्रदा

न करण्यात येणारा ‘राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड-२०२६’ हा प्रतिष्ठेचा पु

रस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

था धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

दोंडाईचा येथील हस्ती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना निसर्गमित्र समितीतर्फे दरवर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री जयकुमार रावल होते. यावेळी निसर्गमित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रेमकुमार अहिरे, प्रदेशाध्यक्ष डी. आर. पाटील, हस्ती बँकेचे चेअरमन कैलासभाऊ जैन, महासचिव संतोषराव पाटील, राज्य उपाध्यक्ष आर. डी. पाटील, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव भदाणे, उपाध्यक्ष विलासराव देसलेविश्वासराव पगार तसेच विक्रमसिंह राजेंद्र काळे आणि सौ. रत्नाताई राजेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्र काळे पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सन्मानामुळे धुळे जिल्ह्यासह सकल मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पुरस्काराबद्दल धुळे राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक समिती, धुळे जिल्हा सकल मराठा समाज तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी राजेंद्र काळे पाटील यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Share.
Leave A Reply

Exit mobile version