Spread the love

धूळपेरणीदरम्यान दुर्दैवी घटना; सुमारे ₹1 लाखांचे नुकसान, भरपाईची मागणी

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे धूळपेरणी करत असताना विजेचा धक्का लागून शेतकरी ज्ञानेश्वर एकनाथ तळेले यांच्या बैलजोडीतील एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने शेतकरी आणि दुसरा बैल थोडक्यात बचावले.

ज्ञानेश्वर तळेले हे आपल्या बैलजोडीसह शेतात धूळपेरणी करत असताना अचानक विजेचा प्रवाह बैलांना व त्यांनाही स्पर्श झाला. विजेच्या तीव्र धक्क्यामुळे एका बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर शेतकरी आणि दुसरा बैल सुदैवाने बचावले.

खरिपाच्या पेरणी हंगामाच्या तोंडावरच सुमारे एक लाख रुपये किमतीचा बैल दगावल्याने तळेले यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. महागाईच्या काळात नवीन बैलजोडी खरेदी करणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच दुबार पेरणीचे संकट असताना या घटनेने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

या घटनेनंतर वीज वितरण कंपनी आणि महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून नवीन बैलजोडी खरेदीसाठी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर तळेले तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version