Spread the love

ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम; ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब

धरणगाव | प्रतिनिधी

स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने रविवारी (दि. २८ जून २०२६) धरणगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात आणि प्रभावीपणे राबविण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

शहरातील प्रत्येक भागातील बालकांपर्यंत पोलिओची लस पोहोचविण्यासाठी एकूण २१ पोलिओ लसीकरण बुथ उभारण्यात आले होते. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’ देऊन पोलिओपासून संरक्षण करण्यात आले.

सकाळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक साळुंखे यांनी विविध लसीकरण केंद्रांना भेट देत कामकाजाची पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी डॉ. साळुंखे यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की, “पोलिओ निर्मूलनासाठी प्रत्येक बालकाला वेळेवर लस देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. धरणगावकरांनी या मोहिमेला नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये.”

आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version