Spread the love

हत्तीडोह येथील नव्या मंदिरात ५ जुलै रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरात चामुंडा देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. ‘जय माता दी’च्या जयघोषात आणि ढोल-ताशे तसेच डीजेच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत महिला, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बडगुजर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या चामुंडा देवीचे भव्य मंदिर पांजरा नदीकाठी हत्तीडोह परिसरातील चामुंडा नगर येथे उभारण्यात आले आहे. या मंदिरात ५ जुलै रोजी चामुंडा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून, त्यानिमित्त शहरातील महाराणा प्रताप चौकातून मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेतील भाविक, कलशधारी महिला तसेच आकर्षक सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये विराजमान चामुंडा देवीची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महाराणा प्रताप चौकातून निघालेली मिरवणूक गांधी पुतळा चौक, एकवीरा देवी मंदिर मार्गे हत्तीडोह येथील चामुंडा देवी मंदिरात पोहोचली. संपूर्ण मार्गावर ‘चामुंडा माता की जय’ आणि ‘जय माता दी’च्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता.

यावेळी चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष गुलाब बडगुजरसंजीव बडगुजरमनोहर बडगुजर, सचिव राजू बडगुजर, सहसचिव सुधाकर बडगुजर व गोकुळ बडगुजर, खजिनदार विनायक बडगुजर, सहखजिनदार सतीश बडगुजर यांच्यासह सुनील बडगुजरहेमराज साळुंखेप्रदीप चव्हाणमनोज चव्हाणलक्ष्मण बडगुजरहिरालाल बडगुजरभगवान चव्हाणराजेंद्र नांदेडकरईश्वर बडगुजर, महिला भगिनी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५ जुलै रोजी हत्तीडोह येथील नव्या मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version